Home / Uncategorized / सुशिक्षितांमध्ये विभक्तीचे वाढते प्रमाण!

सुशिक्षितांमध्ये विभक्तीचे वाढते प्रमाण!

अ.भा.लेवा पाटीदार युवक महासंघाच्या वधु-वर परिचय मेळाव्यात माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांची खंत.

भुसावळ । समाजातील उच्चशिक्षितांमधील घटस्फोटाचे प्रमाण जास्त असणे समाजासाठी चिंताजनक आहे. यासाठी समाजातील मुला, मुलींना पालकांनी चांगले मार्गदर्शन केले पाहिजे. शिक्षणामुळे माणुस सुशिक्षीत होते, मात्र संस्कारीत नाही. मात्र अहंकार येवून जीवनात समस्या निर्माण होत असल्यास त्या सोडविण्यासाठी शिक्षणाचा सदुपयोग करा, असा सल्ला माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी दिला. दिनांक 11 नोव्हेंबरला भुसावळ येथील संतोषीमाता सभागृहात आयोजित अखिल भारतिय लेवा पाटीदार युवक महासंघ आयोजित वधु-वर परिचय मेळाव्यात मार्गदर्शन करतांना बोलत होते.

अध्यक्षस्थानी कुटुंबनायक रमेश पाटील उपस्थित होते. प्रमुख अतिथी खा. रक्षा खडसे, आ. हरिभाऊ जावळे, महापौर स्मीता भोळे, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी आ. निळकंठ फालक, माजी आ. शिरीष चौधरी, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, गोलू पाटील, महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाशराव पाटील, उपाध्यक्ष राजेश चौधरी, दिनेश भंगाळे, नगरसेवक मुकेश पाटील, अमोल इंगळे, परिक्षीत बर्‍हाटे, बंडू भोळे, डॉ. प्रशांत फालक, सुहास चौधरी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात कुटुंबनायक रमेश पाटील यांनी सांगितले की, मोबाईलचा संवाद सुलभतेसाठी आहे. त्याच्या वापराने आपल्या जीवनात समस्या उत्पन्न होणार नाही याची काळजी आई, वडील व मुलांनी घ्यावी. विवाह जोडताना मुलामुलींच्या कुंडलीतील गुण ब्राह्मणांनाकडे जाऊन पाहण्यापेक्षा अंगभूत गुण पाहणे अपेक्षित आहे. लग्नकार्यात बँड लावून अधिक खर्च करू नका, तसेच मुलींच्या लग्नात नाचण्यावर अंकुश लावा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना यावेळी केले.

आईवडिलांना मान द्या ः आमदार जावळे
विवाहानंतर मुलामुलींच्या संसारात अतिरिक्त हस्तक्षेप प्रकर्षाने टाळला पाहिजे. विवाहानंतरच्या काळात एकमेकांना राग, लोभ, रुसवे, फुगवे समजून घेतले पाहिजेत. अपेक्षित निवड झाल्याने चांगले जीवन जगण्यासह लग्नातील अनावश्यक खर्च टाळायला हवा.

समाजात प्रेम विवाहाचे प्रमाण वाढत आहे. हे करत असताना सामाजिक स्तर, शिक्षण आदी विचारात घेतले पाहिजे, अन्यथा अल्पावधीतच प्रेम भंग होतात. असे अनेक उदारहणे समोर असल्याचे चित्र आहे. तसेच आपला जोडीदार निवडतांना आई वडिलांना विश्‍वाासात घ्या, असा मोलाचा सल्ला नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिला.

कार्यक्रमात एक हजार विवाह इच्छुकांच्या सुचीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यात 37 वधू तर 27 वर अशा 61 जणांनी आपला परिचय करुन दिला.

कार्यक्रम यशस्वीततेसाठी यांनी घेतले परिश्रम
प्रास्ताविक महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मुकेश चौधरी तर आभार शहराध्यक्ष देवा वाणी यांनी मानले. यशस्वीतेसाठी देवा वाणी, शाम भारंबे, रुपेश चौधरी, कोमल चौधरी, कल्पेश पाटील, नीलेश राणे, नीरज किरंगे, राहुल नेमाडे, अमोल इंगळे, पवन फालक, संकल्प वाणी, विनय चौधरी यांच्यासह पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

(संकलन ः खेमचंद पाटील)

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …