Home / Uncategorized / समता भ्रातृ मंडळातर्फे वधू-वर मेळावा उत्साहात

समता भ्रातृ मंडळातर्फे वधू-वर मेळावा उत्साहात

विविध मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती

पिंपरी-चिंचवड । समता भ्रातृ मंडळ, पिंपरी-चिंचवडतर्फे रविवार 18 नोव्हेंबर रोजी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळावा भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सकाळी 9.30 ते दुपारी 3 वाजेदरम्यान मोठ्या उत्साहात मंगलमय वातारणात पार पडला. या कार्यक्रमास लेवा पाटीदार समाज बांधवांची उपस्थिती लक्षणीय ठरली. या कार्यक्रमात 190 वधू व 175 वरांनी सहभाग नोंदवून परिचय दिला. व त्यांच्याशी सुसंवाद साधण्यात आला.

या मेळाव्यास माजी खासदार उल्हासराव पाटील यांना कार्यक्रमाचे अध्यक्षपद देण्यात आले. रावेर मतदार संघाचे आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी, पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक नामदेव ढाके, शिक्षण सभापती जळगाव पोपटराव भोळे, समता भ्रातृ मंडळाचे संस्थापक भागवत चौधरी, अध्यक्ष रविंद्र बर्‍हाटे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे मंडळातर्फे स्वागत करून उचित सत्कार करण्यात आला. तसेच समाजबांधवांच्या उपस्थितीत मंडळाच्या वधू-वर सूची 2018’ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या वधू-वर मेळाव्यामुळे समाजातील आंतरजातीय विवाहास आळा बसू शकेल असा विश्‍वास कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये मंडळाचे सचिव चुडामण नारखेडे यांनी व्यक्त केले. तसेच वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. हा वधू-वर मेळावा आयोजित केल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष उल्हासराव पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये आयोजकांचे अभिनंदन तसेच आनंद व्यक्त केला.

जळगावचे शिक्षण सभापती यांनी आपल्या मनोगतमध्ये वधू-वरांना शुभेच्छा देऊन समाजबांधवांना बहूमूल्य मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे लेवा पाटीदार समाज हा प्रगतीपथावर असून, ही भाग्यदाय बाब असल्याचे आमदार हरिभाऊ जावळे व माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या मनोगतात नमूद केले. तसेच कार्यकारिणी मंडळाचे कौतुक केेले.

या मेळाव्यात पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मंडळाच्या ऑनलाईन सेवेचा समाजबांधवांना खूप मोठा फायदा होत असल्याचे नितीन बोंडे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रम यशस्वीततेसाठी यांचे लाभले योगदान
या वधू-वर मेळाव्यास हर्षल खाचणे, प्रितम नेहते, अक्षय बर्‍हाटे, हितेश चौधरी, राहुल बेंडाळे, तुषार पाटील, देवेंद्र भारंबे, जितेंद्र बेंडाळे, उमेश राणे, गणेश बढे, चंदू चौधरी, देवराम पाटील, तुकाराम बर्‍हाटे, विकास टेकडे, संजीव नेहते, भूषण वायकोळे, तनोज टोके, छोटू महाजन, निता नारखेडे, सुरेखा नेहते, मनिषा इंगळे, उज्ज्वला पाटील, रेखा चौधरी, जयश्री चौधरी, कोमल तळेले, हर्षा महाजन, कल्पना महाजन, ज्योती टेकडे, वैशाली टेकडे, दिपाली महाजन, जयश्री वायकोळे, छाया बर्‍हाटे, योगेश इंगळे, विजय इंगळे, देवीदास कोलते, मनोहर चौधरी, सौरभ बढे, प्रज्ञा टोके, सुवर्णा फेगडे, रजत चौधरी, सचिन चौधरी, योगेश महाजन, जितेंद्र वारके, पियुष वारके, तुषार नेमाडे, भारती बर्‍हाटे, रचना बर्‍हाटे, या समाज बांधव-भगिणींचे कार्यक्रम यशस्वीततेसाठी योगदान लाभले.

तसेच कार्यकारिणी मंडळातील रविंद्र बर्‍हाटे, रघुनाथ फेगडे, घनश्याम जावळे, भानुदास इंगळे, चुडामण नारखेडे, किरण चौधरी, सिताराम राणे, रमेश इंगळे, जितेंद्र होले, सुरेश फेगडे, डीगंबर महाजन, नरेंद्र पाटील, जयंत चौधरी, गिरीश पाटील, रेखा भोळे, निनाद वायकोळे, निखील राणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. हिमानी पाडळसेकर यांनी केले तर त्यांना सहकार्य हर्षला फेगडे, डिंपल राणे, दिव्यल नेहते यांनी केले. आभार प्रदर्शन सचिन चौधरी यांनी केले तर पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …