Home / Uncategorized / लेवा पाटीदार मित्रमंडळाचा वधू-वर परिचय मेळावा

लेवा पाटीदार मित्रमंडळाचा वधू-वर परिचय मेळावा

औरंगाबाद । लेवा पाटीदार मित्रमंडळातर्फे सौभाग्य मंगल कार्यालय येथे नुकताच वधू-वर मेळावा पार पडला. या राज्यस्तरीय मेळाव्यात 60 हून अधिक वधू-वरांनी सहभाग नोंदविला.

लेवा समाज पंचायत राया पाडळसे, कुटुंब नायक रमेश पाटील, अ‍ॅड. प्रकाश पाटील, अखिल भारतीय युवा संघ अध्यक्ष डॉ. प्रमोद महाजन, प्रशांत फालक, चारुदत्त नारखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. लेवा पाटीदार मित्रमंडळाचे अध्यक्ष मधुकर सरोदे व महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सिंधूताई पाटील यांच्या हस्ते वधू-वर सूचीचे प्रकाशन करण्यात आले.

लेवा पाटील समाजाचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना एकांगी टाकून राजीकय वनवासात टाकण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. मात्र लेवा पाटील समाज नाथाभाऊंच्या पाठीशी समर्थपणे उभा आहे. याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील, असे रमेश पाटील म्हणाले. मेळाव्यात संभाव्य वधू-वरांनी परिचय करुन दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता सरोदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष जगन्नाथ किनगे, अशोक पाटील, भागवत पालक, पंढरीनाथ लोखंडे, डी. के. कोलते, अनंत वराडे, विठ्ठल भंगाळे यांनी पुढाकार घेतला.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …