Home / Uncategorized / लेवा पाटीदार मित्र मंडळ, सांगवी वधुवर परिचय मेळावा

लेवा पाटीदार मित्र मंडळ, सांगवी वधुवर परिचय मेळावा

आकुर्डी । संसार हा पती-पत्नीचा असतो. त्यातून कौटुंबिक नाते वृद्धींगत होते. लग्नामधून पती-पत्नीचे नाते घट्ट होते. तसेच दोन कुटुंबातील ऋणानुबंधातमध्ये कुटुंब जोडले जाते, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे नगरसेवक नामदेव ढाके यांनी केले. लेवा पाटीदार मित्र मंडळ, सांगवी, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतीक भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमास सुमारे 800 समाज बांधवांनी उपस्थिती दर्शविली. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ नगरपालिकेचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, डॉ. सोहम नारखेडे, प्रज्ञा पाटील, बी. टी. चौधरी, नामदेव ढाके, आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. अश्‍विनी नारखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते वधू-वर सूचीचे प्रकाशन करण्यात आले. यावेेळी बोलताना नगरसेवक ढाके म्हणाले की, ‘नात्याचे रेशीमबंध आपल्या जीवनात सुखाचे रंग भरतात. जगातील सर्व वादांवर प्रेम आणि सामोपचार हाच एकमेव तोडगा आहे. जी गृहिणी सुख-दुःखांना सामोरे जाऊन संसाराचा डोलारा समर्थपणे सांभाळते त्या घराते लक्ष्मी नांदते. ज्या घरातील स्त्री समाधानी नसते त्या घराची प्रगती कधीच होऊ शकत नाही.”

या कार्यक्रमाचे संयोजन डॉ. लिलाधर पाटील, देवेंद्र पाटील, अशोक तळेले, प्रेमचंद पाटील, विलास पाटील, विष्णू चौधरी, भूषण गाजरे, व नथ्थू भोळे यांनी केले. तर प्रास्ताविक, भागवत झोपे, सुत्रसंचालन पंकज पाटील, प्रा. कमल पाटील, आभार महेश बोरोले यांनी मानले.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …