Home / Uncategorized / कमी लिहा मात्र दर्जेदार लिहा : ना.धो.महानोर

कमी लिहा मात्र दर्जेदार लिहा : ना.धो.महानोर

ग्रेट भेट – पद्मश्री कविवर्य महानोर यांच्याशी रंगल्या गप्पा..

मराठवाड्याच्या टोकाला जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी पळसखेड येथील कृषिरत्न पद्मश्री कविवर्य, सुप्रसिद्ध गीतकार ना.धों.महानोर हे देशाचे नाही तर अखंड विश्‍वाचे कवी होत. जळगावात राज्यस्तरीय ओबीसी साहित्य संमेलनानिमित्त पद्मश्री कविराज श्री. महानोर यांच्याशी मनमोकळेपणे गप्पा मारल्यात. तुषार वाघुळदे, मराठवाडा औरंगाबाद येथील कवयित्री माधुरी चौधरी, प्राचार्य राजेंद्र वाघुळदे, डॉ. महेंद्र चौधरी यांनी चर्चेत सहभाग घेतला.

यावेळी चर्चासत्रादरम्यान कविवर्य महानोर यांनी सांगितले की, राज्यात 7/8 ठिकाणी माझ्या पुढाकाराने, आणि आर्थिक सहकार्याने विविध भागात साहित्य संमेलने सुरू आहेत. आज 30/32 वर्षानंतरही सातत्य सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. संमेलनातून अनेक लेखकांना अध्यक्षपदाचा मान ही मिळाला, असे त्यांनी आनंदाने सांगितले. तुम्ही साहित्य क्षेत्रात चांगले कार्य करा, कमी लिहा पण दर्जेदार लिहा, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला, व शुभेच्छाही दिल्या. साहित्य विषयावर जवळजवळ अडीच तास मनमोकळेपणाने गप्पाही रंगल्यात.

महानोरांनी साथला मिश्किलपणे संवाद…
अनेक पुरस्कारप्राप्त तापीकन्या कवयित्री सौ. माधुरी यांनी त्यांचा मधुर आवाजाच्या मेलोडीचा काव्यसंग्रहही त्यांना भेट म्हणून देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. तुषार वाघुळदे आणि शिरीष चौधरी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वाघुळदे यांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना कवीवर्य यांनी आपल्या खास शैलीत आणि मिश्किलपणे उत्तरे दिली.

यावेळी प्रश्‍नोत्तराच्या मैफलीत महानोरांनी काव्यपंक्तींसह अनमोल विचारही व्यक्त केले.

’गुंतलेले प्राण ह्या रानात माझे …
फाटकी ही झोपडी काळीज माझे ’…
मी असा आनंदूनी बेहोष होता ,
शब्दसंगे तू मला बाहुत घ्यावे…

जैत रे जैत, सर्जा, एक होता विदूषक, मुक्ता आणि दोघी या चित्रपटांचे गीत लेखन करणारे निसर्गकवी महानोर ..!!

जांभूळ पिकल्या झाडाखाली, ढोल कुणाचा वाजं जी… हे आणि इतर सर्वच गाणी रसिकमान्य झालीत. तसेच मी रात टाकली. मी कात टाकली, मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली…’ नभ उतरू आलं, चिंब थरथर वलं, अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात…’ दूरच्या रानात केळीच्या बनात..’, ’मी गाताना गीत तुला लडिवाळा… हा कंठ दाटूनी आला,’ तसेच आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या… अशी अनेक सरस गाणी आजही अनेकांच्या ओठावर रेंगाळत असल्याचे त्यांनी या चर्चेदरम्यान विशेष नमूद केले.

या चर्चेदरम्यान, कविवर्य महानोर यांनी अनेकांना प्रोत्साहन दिले आहे. कवितेमुळे माणूस किती मोठा होतो, हे शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे, असे ते आनंदाने म्हणाले. यावेळी उपस्थितांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

(संकलन : नेहा राणे)

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …