Home / Uncategorized / भारतरत्न सरदार पटेल यांचा वारसा तेवत ठेवण्याचे आवाहन

भारतरत्न सरदार पटेल यांचा वारसा तेवत ठेवण्याचे आवाहन

डॉ.रविंद्र भोळे यांचे प्रतिपादन
पुणे येथे राष्ट्ररत्न पुरस्कारांचे वितरण

फैजपूर । स्वतंत्र्य भारताचे पहिले गृहमंत्री भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कणखर नेतृत्वामुळे तत्कालीन पाचशेच्यावर संस्थाने भारतात विलीन करण्यात आली. त्यांच्या मुत्सद्दी व संघटीत कौशल्यपूर्ण नियोजनामुळेच शक्य झाले. त्यांच्या गुणांचे अनुकरण आज प्रत्येक क्षेत्रात गरजेचे असल्याने त्यांचा वारसा तेवत ठेवला पाहिजे असे प्रतिपादन डॉ. रविंद्र भोळे यांनी केले. डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट उरळी कांचन आणि नेहरु युवा केंद्र क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्यातर्फे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षी भाषणात ते बोलत होते. या कार्यक्रमात भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल, राष्ट्ररत्न पुरस्कार 2018 व मणिरत्न शिक्षक गौरव पुरस्कार 2018 या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर लेवाशक्ति मासिकाचे संस्थापक, संपादक तसेच सिद्धीविनायक ग्रुपचे अध्यक्ष कुंदन ढाके, उद्योजक मिलींद चौधरी, डॉ. दीपक उर्फ ज्ञानेश्‍वर पाटील (विकासक), डॉ. प्रदीप पाटील, डॉ. अशोककुमार पगारिया, कर्नल अरविंद जोगळेकर, कॅप्टन शिंदे, डॉ. एल. झेड. पाटील, प्रगतशील शेतकरी टेनू बोरोले, धनंजय फिरके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

राष्ट्ररत्न पुरस्कार प्राप्त मानकरी…
1) ललितकुमार निळकंठ फिरके – पत्रकार, न्हावी, ता. यावल
2) टेनू डोंगर बोरोले – प्रगतशील शेतकरी, न्हावी, ता. यावल
3) ललित पांडुरंग चौधरी – उपशिक्षक – शकुंतला जे. माध्य. विद्यालय, जळगाव
4) प्रसन्न मधुकर बोरोले – उपशिक्षक – जिजामाता प्राथ. विद्यामंदीर, भुसावळ
5) अजित निळकंठ चौधरी – उपशिक्षक – प्राथमिक विद्यामंदीर, शारदा कॉलनी, जळगाव

मणिरत्न शिक्षकगौरव पुरस्कार प्राप्त मानकरी
1) सौ. स्वाती धनंजय फिरके – उपशिक्षिका शा. ल. खडके, प्राथ. विद्यामंदीर, जळगाव
2) योगेश मोहन इंगळे – उपशिक्षक – जि. प. प्राथ. शाळा, पिंप्री, ता. यावल
3) प्रफुल्ल वासुदेव सरोदे – मुख्याध्यापक युवविकास फाउंडेशन संचलित प्राथ. विद्या. जळगाव
4) सौ. चैताली गोविंद लोखंडे – उपशिक्षिका – त्र्यंबकनगर प्राथ. विद्यामंदीर, जळगाव

माजी. खा. डॉ. उल्हास पाटील यांनाही राष्ट्ररत्न पुरस्कार जाहिर झाला होता, मात्र ते उपस्थित नसल्याने त्याचा पुरस्कार धनंजय फिरके यांनी स्वीकारला. जळगाव जिल्ह्यातील एकूण दहा व्यक्तींना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. सर्व पुरस्कारार्थीचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …