Home / Uncategorized / प्रा.श्रीकांत चौधरी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

प्रा.श्रीकांत चौधरी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

न्हावी, यावल । फैजपुर येथील रहिवाशी तसेच भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात यांत्रिकी विभागातील सहाय्यक प्राध्यापक श्रीकांत उल्हास चौधरी यांना नुकतीच मेकॅनिकल इंजीनियरिंग या शाखेतून एस एस एस यु टी एम एस भोपाळ विद्यापीठातर्फे पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी थर्मोडायनामिक इन्वेस्टीगेशन ऑफ नॅनो पी.सी.म. एज एच.टी.एफ. हिट एक्सचेंजर फॉर थरमल एनेर्जी स्टोरेज इन कॉन्सेनट्रेटिंग सोलर थरमोईलेक्ट्रिक जनरेशन सिस्टीम या विषयावर संशोधन पूर्ण करून शोध प्रबंध सादर केला. त्यांना डॉ. जी आर सीलोकर यांचे मार्गदर्शन लाभले. ते सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी डॉ. उल्हास चौधरी व प्राथमिक शिक्षिका सौ.विद्याराणी चौधरी यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या यशाबद्दल डॉ. वासुदेव पाटील ,राजेंद्र ब-हाटे, यांच्यासह अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …