Home / Uncategorized / केयुरी अत्तरदेचे कराटेमध्ये सुयश

केयुरी अत्तरदेचे कराटेमध्ये सुयश

पुणे । येथे 24 जून 2018 रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत केयुरी अत्तरदे हिने सुवर्णपदक आणि कांस्यपदक पटकावले आहे. वर्ल्ड फुनाकोशि शोतोकँन कराटे आँरगनाझेशन (WFSKO) कडून हि स्पर्धा घेण्यात आली होती. केयुरीने आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत यशस्वी कामगिरी केली असून दोन स्वर्णपदक, दोन रौप्यपदक आणि पाच कांस्यपदक पटकावले आहेत. 2016 मध्ये घेण्यात आलेल्या वर्ल्डकप कराटे च्यँमपियनशिपमध्ये देखील तिने दोन कांस्यपदक पटकावले आहेत.

10 वर्षाची केयुरी वयाच्या सहाव्या वर्षापासून कराटे शिकत असून तिने ब्लँक बेल्ट हि पदवी परीक्षा पूर्ण केली आहे. केयुरीला कराटे प्रशिक्षिका भारती जीभकाटे (3 डँन ) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. याशिवाय ’योगा’ मध्येही तिने प्राविण्य संपादन केले आहे. योगा विषयक चार परिक्षाही तिने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्या आहेत. केयुरी इ.5 व्या वर्गात शिकत आहे. शाळेतील विविध उपक्रमात आणि विवीध स्पर्धात तिला अनेक पारितोषिक मिळालेली आहेत.श्री. निळकंठ अत्तरदे आणि सौ. प्रज्ञा अत्तरदे यांची ती कन्या आहे. तिला आपल्या भावी यशासाठी हार्दिक शुभेच्छा.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …