Home / Uncategorized / योगिता नेमाडे यांना सुवर्ण पदक

योगिता नेमाडे यांना सुवर्ण पदक

खान्देशच्या नवोदित कवयित्री म्हणून ओळख असलेल्या व जे.टी. महाजन, तंत्रनिकेतन मधून उत्तीर्ण झालेल्या योगिता योगेश नेमाडे ह्या नाडगाव ता. बोदवड येथिल आहेत, माहेर – अंजाळे ता.यावल त्यांना माहेरी असतानाच कविता बनविण्याची व कविता वाचनाची आवड असल्याने त्यांना अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान डोंबिवली व संकल्प इंग्लिश स्कूलचे संस्थापक डॉ.राज परब निर्मित साई इव्हेंट्स युट्युब मालिका आठवणीतील कवितेचे 100 विक्रमी भाग यशस्वीरीत्या पार पडले. या राष्ट्रीय विक्रम केलेल्या मालिकेचा एक भाग आपल्या खान्देशातल्या नवोदित कवियत्री योगिता योगेश नेमाडे ही होत्या. कविता वाचनाबद्दल त्यांना सुवर्ण पदक प्राप्त झाले .

27 ला कल्याण येथे पार पडलेल्या कौतुक सोहळ्यात कवयित्री योगिता योगेश नेमाडेंचा सुवर्ण पदक व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …