Home / Uncategorized / बदलत्या जगातील अडथळ्यांवर तंत्रज्ञानाद्वारे मात करावी

बदलत्या जगातील अडथळ्यांवर तंत्रज्ञानाद्वारे मात करावी

अमेरिका, न्यू जर्सी स्थित नाशिकचे प्रमोद अत्तरदे यांचे उद्योजकांना आवाहन

एलसीसीआयच्यावतीने ‘उद्योजक समूह‘ कार्यक्रम उत्साहात

लेवा समाजातील उद्योजकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन

पुणे । लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (एलसीसीआयए)च्या तसेच जळगाव जिल्हा लेवा समाज मंडळाच्यावतीने 3 फेब्रुवारी 2019 रोजी निगडी येथे लेवा समाजातील व्यावसायिकांसाठी लेवा उद्योजक समूह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये समाजातील उद्योजक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून कार्यक्रमात सहभाग नोंदविला. यावेळी सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिका, न्यू जर्सी स्थित नाशिकचे प्रमोद अत्तरदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, जग फार वेगाने बदलत आहे. आणि स्थापित होत असलेल्या पारंपारिक तंत्रज्ञान आणि व्यवसायांना नवीन विघटनकारी तंत्रज्ञानाद्वारे विस्थापित केले जात आहे. बदलत्या जगात उद्भवत असलेल्या अडथळ्यांना अनुकूल करण्याची आणि स्वत: साठी संधी निर्माण करण्यासाठी व्यत्यय वळणापासून पुढे कसे जावे, याबद्दल प्रमोद अत्तरदे यांनी मौल्यवान मार्गदर्शन मार्गदर्शन केले. अत्तरदे हे सीरियल उद्योजक आणि ब्लॉक चेन लेखक आहेत.

मेळाव्यास उद्योजकांची उपस्थिती
लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (एलसीसीआयए) समितीचे अध्यक्ष रवींद्र चौधरी, उपाध्यक्ष मिलिंद चौधरी, उपाध्यक्ष वासू पाटील, सचिव कुंदन ढाके, संयुक्त सचिव पवन भोळे, पुरुषोत्तम पिंपळे, तसेच एलसीसीआयए पुणे, पिंपरी चिंचवड आणि कृषी विभागाचे समिती सदस्यही उपस्थित होते.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …