Home / Uncategorized / सौरभ अत्तरदे याला डॉक्टरेट जाहीर

सौरभ अत्तरदे याला डॉक्टरेट जाहीर

पुणे । सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातर्फे सौरभ संतोष अत्तरदे याला डॉक्टरेेट जाहिर करण्यात आली असून, तसे प्रमाणपत्रही देण्यात आलेले आहे. डॉ. सौरभ याने झिओलॉजी विषयात ‘ विवो अ‍ॅण्ड टॉक्झिसीटी ऑफ नॅनोगोल्ड कॉन्जुगेटेड जीएनपी-एनएन-32 फ्रॉम इंडियन स्पेक्टेकल्ड कोब्रा व्हिनॉम‘ यावर थेसीस केलेले आहे. सौरभ याला “ डॉक्टरेट” प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी सावित्रीबाई विद्यापीठात 9 फेब्रुवारी 2019 रोजी कार्यक्रमात पीएचडी घोषित करण्यात आली आहे.

सौरभच्या या यशामधे त्याची आई मनिषा व वडील संतोष अत्तरदे यांचे खूप मोठे योगदान आहे. हलाकीची परिस्थिती असताना त्यांनी या अभ्यासक्रमासाठी त्याला वेळोवेळी आर्थिक मदत व सहकार्य केले. त्यांच्या कष्टाचे सौरभ याने चीज केल्याने सौरभचे सर्वोतोपरी कौतुक होत आहे. सर्व नातेवाईक व आप्तेष्टांकडून डॉ. सौरभ याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच समाजबांधवांकडून कौतुकही होत आहे.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …