Home / Uncategorized / डोंबिवलीत रंगला वधू-वर परिचय मेळावा

डोंबिवलीत रंगला वधू-वर परिचय मेळावा

लेवा शुभमंगल (अ‍ॅप) आयोजित सकल लेवा पाटीदार समाजाचा वधू-वर परिचय मेळावा

डोंबिवली । लेवा शुभमंगल (अ‍ॅप) आयोजित सकल लेवा पाटीदार समाजाचा वधू-वर परिचय मेळावा 17 फेब्रुवारी 2019 रोजी डोंबिवली येथे घ. ना. चौधरी विद्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमासाठी सुमारे 500 विवाहेच्छुक युवकांनी आपला परिचय दिला. तर या मेळाव्यास सुमारे 600 पालक वर्ग उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी काश्मिर, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हर्षल जावळे यांंच्या बर्‍याच वर्षांच्या सामाजिक कार्यानंतर हा कार्यक्रम आयोजन केले होते.

यावेळी डॉ. राम नेमाडे, डॉ. प्रशांत फालक, नीशाताई अत्तरदे व हर्षल जावळे आदी मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.विशेष अतिथींनी दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. नोंदणी कक्षानुसार सर्व उपस्थित विवाहेच्छूक तरुण व तरुणी व पालकांना सभागृहात सोडण्यात आले.

हर्षल जावळे यांनी लेवा शुभमंगल(अ‍ॅप) विवाह सोहळ्याविषयी प्रास्ताविक भाषण केले. मान्यवर विशेष अतिथी डॉ. राम नेमाडे व इतर मान्यवरांनी विवाह सोहळ्याविषयी मनोगत व्यक्त केले. डॉ. प्रशांत फालक यांनी प्रार्थना सादर केली. समाजातील विवाहेच्छुक तरुण-तरुणी व पालकांनी या कार्यक्रमाला भरभरुन दाद दिली. तसेच समाजबांधवानी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपस्थित राहून सहकार्य केले. ‘लेवा सखी कला मंच डोंबिवली’च्या पदाधिकारी व इतर सखींनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली व सहकार्य केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम अत्तरदे, रवी पाटील, नीलीमा नेमाडे व सुजाता पाटील यांनी केले.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …