Home / Uncategorized / पायल चौधरीस बीडीएसची शिष्यवृत्ती!

पायल चौधरीस बीडीएसची शिष्यवृत्ती!

बंगळुरु/भुसावळ । भुसावळ येथील मूळ निवासी व सध्या सातारा जिल्ह्यातील कराड येथील स्कूल ऑफ डेंटल सायंसेस कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेसमध्ये शिकत असलेल्या पायल संदीप चौधरी हिला शिष्यवृत्ती मिळालेली आहे. त्यामुळे पायल हिचे सर्वतोपरी कौतुुक होत असून, तिच्या सह तिच्या आई-बाबांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बीडीएसच्या चारही वर्षात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्यामुळे तिला चारही वर्षात कॉलेजकडून शिष्यवृत्ती मिळालेली आहे. तिने डेन्टिस्ट्रीवर लिहीलेले एक आर्टिकलही इन्टरनॅशनल जरनल ऑफ ‘पेरीओडॉनटोलॉजी अ‍ॅन्ड इमप्लॉटोलॉजी’ मध्ये छापून आलेले आहे.

भुसावळ येथील मूळ निवासी व सध्या बंगळुरु येथे रहात असलेले संदीप सुकदेव चौधरी व कांचन चौधरी यांची पायल ही मुलगी आहे. 10 मे रोजी कराड येथे झालेल्या समारंभात तिला बेस्ट आउट गोईंग स्टुडंट फ्रॉम बीडीएस म्हणून गौरविले असून, ‘चान्सलर कृष्णा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायंसेसकडून गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले आहे. तसेच बेस्ट आउटगोईंग स्टुडन्ट फ्रॉम युनिव्हर्सिटी म्हणून दुसरे गोल्ड मेडलही प्रदान करण्यात आले आहे.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …