Home / Uncategorized / लेवाशक्ति सखी मंच बुलडाणातर्फे योगदिन साजरा

लेवाशक्ति सखी मंच बुलडाणातर्फे योगदिन साजरा

बुलडाणा । दि.21 जून रोजी जागतिक योगदिनानिमित्त ‘लेवाशक्ति सखी मंच, बुलडाणा’च्या वतीने योगदिन साजरा करण्यात आला. योगदिनाच्या निमित्ताने शिवशंकर नगर येथील ‘भ्रातृमंडळ’च्या इमारतीमध्ये योग व आहारावर आधारित फलक लावण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून लाभलेल्या मंगला भगत व प्रमुख पाहुण्या जयश्री चोपडे यांनी प्रथम ‘ॐ’ च्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर त्यांनी महिलांना आपल्या शारीरिक, मानसिक व आत्मिक शांतीसाठी योग किती आवश्यक आहे याचे महत्व पटवून दिले.

कार्यक्रमातील पाहुण्यांचा परिचय कल्पना किनगे व रेवती पाटील यांनी करुन दिला, तर उषा खर्चे यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये डॉ.दिपाली पाटील यांनी भक्तीयोग, ज्ञानयोग, राजयोग, कर्मयोग इ.वर माहिती दिली. तसेच जयश्री पाटील यांनी श्‍लोक, हर्षा वराडे यांनी अमृतवचन सादर केले.

यानंतर योगशिक्षिका कुंदा पाटील यांनी –
‘ही योगाची दिव्य पताका भारत देशी
मिरवू या, योग शिकू अन् शिकवू या’
हे योगगीत सादर करुन अष्टांगयोगाची माहिती सांगितली. तसेच उपस्थित महिलांनी दररोज कोणत्या प्रकारचे सुक्ष्म व्यायाम करुन शरीर व मन निरोगी ठेवावे याचे प्रात्यक्षिक दाखवून व त्यांचे कडून करवून घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा पाटील तर आभारप्रदर्शन डॉ.वैभवी कोलते यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी उषा वराडे, नयना पाटील, स्मिता खर्चे, ज्योती पाटील, स्नेहल सुपे, सुनंदा पाटील, उषा किनगे, रेणुका टेकाडे यांनी परिश्रम घेतले.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …