Home / Uncategorized / न्हावीकर ते पुणेकर रहिवासी संघाचे स्नेहसंमेलन उत्साहात

न्हावीकर ते पुणेकर रहिवासी संघाचे स्नेहसंमेलन उत्साहात

चिंचवड, पुणे । मूळ न्हावी गावातील रहिवासी जे काही कारणानिमित्त पुणे शहर व परिसरात स्थलांतरीत झाले आहेत, अशा लोकांचा ‘न्हावीकर ते पुणेकर रहिवासी संघ’ असा संघ स्थापन करण्यात आला.

या संघाचे स्नेहसंमेलन दिनांक 26 मे 2019 रोजी आकुर्डी, पुणे येथील खंडोबा देवस्थानच्या हॉलमध्ये संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रथम गणेशाची पूजा करून दीप प्रज्वलन केले. उपस्थितांमधील लहान मुलांचे व महिलांचे खेळ घेण्यात आले. संमेलनात डॉक्टर, वकील, लेखक यांचा सत्कार करण्यात आला, तसेच विजेत्यांना बक्षिसे देण्यात आले. संमेलनाला सुमारे 400 लोकांनी उस्फुर्ततेने सहभाग घेतला. कार्यक्रमात सर्वांचा परिचय करुन देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.बारी यांनी उत्कृष्टपणे केले त्यामुळे कार्यक्रम रंगतदार झाला. खान्देशी पदार्थांमुळे कार्यक्रमाला चढली आणखी रंगत कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित लोकांनी बाफले, वरण, वांग्याची भाजी, भात, अमसुलाची कढी इ. पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …