Home / Uncategorized / सोपानदेव पाटील इंटरनॅशनल क्रिएटिव्ह स्टार अ‍ॅवार्ड 2019 ने सन्मानित

सोपानदेव पाटील इंटरनॅशनल क्रिएटिव्ह स्टार अ‍ॅवार्ड 2019 ने सन्मानित

स्मृतीचिन्ह व मानपत्र देऊन पुरस्काराने सन्मानित

गोवा । एशियन आर्ट, लिट्रेचर, कल्चरल, सोशल कॉन्फरन्स गोवा 2019 तर्फे आयोजित पुरस्कार सोहळा व संमेलन दि.2 जून 2019 रोजी रविन्द्र भवन, गोवा येथे पार पडला.

सोपानदेव मुरारी पाटील (महाराष्ट्र) यांना स्मृतीचिन्ह व मानपत्र देऊन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व डॉ.सौ.मंदाकिनी आमटे यांची उपस्थिती लाभली. तसेच डॉ.बाळकृष्ण खरात(आर्ट, टुरिझम अ‍ॅन्ड कल्चरल कमिटी सिंधुदुर्ग गोवा), जे.डी.सारंग(चेअरमन सिलेक्शन कमिटी), डॉ.रामचंद्र येवले(चेअरमन सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ व्होकेशनल अ‍ॅन्ड टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र) आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …