Home / Uncategorized / आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड हंगेरीसाठी ऋषिकेश चौधरीची निवड

आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड हंगेरीसाठी ऋषिकेश चौधरीची निवड

नाशिक । येथील ऋषिकेश किसन चौधरी याची 30 व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2019, हंगेरी साठी निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा 11 जुलै ते 21 जुलै दरम्यान हंगेरी येथे पार पडणार आहे.

यापूर्वी ज्युनिअर कॉलेजमध्ये असताना ऋषिकेशने ‘आंतरराष्ट्रीय जैवतंत्रज्ञान ओलिंपियाड’ मध्ये चांदीचे पदक मिळविले होते.  सध्या तो ‘ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस,’ दिल्ली येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे.

ऑलिम्पियाड मधील निवडीसाठी ऋषिकेशचे खूप खूप अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …