ठाणे । येथील रहिवासी डॉ.रूपेश मोहन तळेले आणि डॉ.जयश्री रूपेश तळेले यांचा मुलगा वेद रूपेश तळेले याने स्कॉलरशिप परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. वेद हा सरस्वती हायस्कूल इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी आहे.
वेदने स्कॉलरशिपच्या परिक्षेत शाळेतून पहिला, ठाणे जिल्ह्यातून दुसरा तर महाराष्ट्रातून 9 वा क्रमांक पटकाविला आहे. वेदने मिळविलेले यश खरोखरच कौतुकास्पद असे आहे. त्याच्या या यशाबद्द्ल खूप खूप अभिनंदन..