Home / Uncategorized / मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 10वीच्या परिक्षेत लेवा समाजातील युवावर्गाचे भरघोस यश

मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 10वीच्या परिक्षेत लेवा समाजातील युवावर्गाचे भरघोस यश

मीरारोड, भाईंदर । येथील रहिवासी किशोर चौधरी व मोहिनी चौधरी यांची मुलगी श्रेया चौधरी हीने मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 10वीच्या परिक्षेत 92.4% गुण मिळवून यश संपादन केले आहे.
श्रेया ही सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. आई-वडील, भाऊ(प्रतिक), शिक्षक, प्राचार्य या सर्वांचे चांगले मार्गदर्शन मिळाले. श्रेयाला मिळालेल्या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. भावी शैक्षणिक वाटचालीसाठी व यशस्वीतेसाठी लेवाशक्तितर्फे शुभेच्छा!

जळगाव । येथील रहिवासी किशोर ढाके यांचा मुलगा ओम किशोर ढाके याने केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSC) घेण्यात आलेल्या 10वीच्या परिक्षेत 96.8% गुण मिळविले आहे.
ओमला गणितात 100/100 गुण मिळाले आहेत. ओम हा सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल, जळगाव या शाळेचा विद्यार्थी आहे.
ओमला अभ्यासात त्याच्या आईने मार्गदर्शन व पाठींबा दिला.

रावेत, पुणे । येथील रहिवासी ललित राजाराम चौधरी(मूळ गाव फैजपूर) यांचा मुलगा भार्गव ललित चौधरी याने केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSC) घेण्यात आलेल्या 10वीच्या परिक्षेत 94% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
भार्गव हा एस.बी.पाटील पब्लिक स्कूल, रावेतचा विद्यार्थी आहे. भार्गवला पुढील वाटचालीस शुभेच्छा!

चिंचवड, पुणे । येथील रहिवासी विनोद नारखेडे यांचा मुलगा गुंजीत विनोद नारखेडे याने केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSC) घेण्यात आलेल्या 10वीच्या परिक्षेत 92.6% गुण मिळविले आहे.
गुंजीतला मिळालेल्या यशात त्याच्या आई वडिल तसेच सर्व शिक्षक यांचे महत्वपूर्ण भूमिका आहे. वेळोवेळी सर्वांचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे गुंजीतला चांगले यश मिळाले.

चिंचवड । डॉ.राजेंद्र पाटील(फॅमिली फिजिशीअन), व डॉ.प्रीती पाटील(डेंटिस्ट) यांचा मुलगा हिमांशु राजेंद्र पाटील याने 10वीच्या परिक्षेत 94.2% गुण मिळवून यश संपादन केले आहे.
पोद्दार इंटरनॅशनल स्कूल,चिंचवड शाळेतील विद्यार्थी हिमांशु याचा फिजीक्स(पदार्थ विज्ञानशास्त्र) हा आवडता विषय. या विषयाशी संबंधीत क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याची त्याची इच्छा व संशोधनाची आवड आहे.
वरवर अभ्यास न करता खोलात जाऊन सुक्ष्म अध्ययनाची हिमांशुला आवड आहे. त्याला वाचनाचा छंद आहे. हिंदी विषय नावडता असला तरीही खूप अभ्यास केल्याने हिंदीमध्ये शंभरपैकी 99 गुण मिळाले.
हिमांशु आपल्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षकांइतकेच आई वडिलांनाही देतो.

चिंचवड । डॉ.दीपाली(दंतरोगतज्ञ) व डॉ.मंगेश पुरुषोत्तम पाटील(अस्थिरोगतज्ञ) यांची कन्या सई मंगेश पाटील हिने केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSC) घेण्यात आलेल्या 10वीच्या परिक्षेत 96% गुण मिळवून याश संपादन केले आहे.
सई पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची(चिंचवड) विद्यार्थिनी आहे.
अभ्यासाबरोबरच अ‍ॅबॅकस परीक्षेत राज्य व राष्ट्रीय पातळींवर तिने प्रथम पारितोषिक मिळविले आहे. तसेच तिला वाचन, चित्रकला व जीवशास्त्र या विषयांची आवड आहे. सईने चित्रकलेच्या इंटरमिजिएट परीक्षेत अ ग्रेड मिळविली आहे.
सईला गणित या विषयात 97% गुण मिळाले, परंतु जीवशास्राची आवड असल्यामुळे त्यामध्ये संशोधन करण्याची तिची प्रगल्भ इच्छा आहे. तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!

मध्य प्रदेश । येथील रहिवासी तुषार काशीनाथ नारखेडे यांची मुलगी दर्शना तुषार नारखेडे हिने 10वीच्या परिक्षेत 92% गुण मिळवून यश संपादन केले आहे.
दर्शना सेंट अंटोनी ग्लेनेडिअन काँन्व्हेंट हायर सेकंडरी स्कूल, हैदरपूर (मध्य प्रदेश)ची विद्यार्थिनी आहे.

पुणे । येथील रहिवासी डॉ महेश ठोंबरे व डॉ अर्चना ठोंबरे यांची मुलगी गौतमी महेश ठोंबरे हिने माध्यमिक शिक्षण मंडळ भारतीय प्रमाणपत्र (खउडए) तर्फे घेण्यात आलेल्या 10वीच्या परिक्षेत 97.5% गुण तसेच सर्वोत्तम 5 विषयांमध्ये 98% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
गौतमी ही सेंट मेरीज हायस्कूल(पुणे)ची विद्यार्थिनी आहे.
अभ्यासाबरोबरच गौतमी ब्लॅक बेल्ट कराटे चॅम्पियन आहे. चित्रकला, भरतनाट्य, ट्रेकींग याची आवडही तीला आहे.

औंध, पुणे । येथील रहिवासी अतुल आर महाजन यांची मुलगी कुणाली अतुल महाजन हिने केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSC) घेण्यात आलेल्या 10वीच्या परिक्षेत 90.6% गुण मिळविले आहेत.
कुणाली डि.ए.व्ही. पब्लिक स्कूल, औंध(पुणे) ची विद्यार्थिनी आहे.

पुणे । येथील रहिवासी प्राज्ञेय अनंत पाटील व वैशाली प्राज्ञेय पाटील यांची मुलगी सानिका प्राज्ञेय पाटील हिने 10वीच्या परिक्षेत 91% गुण मिळविले आहेत.
अभ्यासाबरोबरच सानिकाने जर्मन सर्टीफिकेशनमध्ये विशेष प्राविण्य मिळविले आहे. सानिका आय.ई.एस. चंद्रकांत पाटकर विद्यालयची विद्यार्थिनी आहे.
सानिकाला पालक, आजी-आजोबा व शिक्षक यांनी योग्य मार्गदर्शन केले.

निगडी, पुणे । येथील रहिवासी प्रशांत लक्ष्मण नारखेडे यांची मुलगी इशिका प्रशांत नारखेडे हीने 10वीच्या परिक्षेत 92% गुण मिळवून यश संपादन केले आहे.
इशिका ही सी.एम.एस. इंग्लिश मीडिअम हायर सेकंडरी स्कूलची विद्यार्थिनी आहे. तीला पुढील वाटचालीस शुभेच्छा!

जळगाव । येथील रहिवासी रविंद्र नारखेडे व मीनाक्षी रविंद्र नारखेडे यांची मुलगी लोचन रविंद्र नारखेडे हीने 10वीच्या परिक्षेत 93.2% गुण मिळवून यश संपादन केले आहे.
लोचन ही डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल(रावेर)ची विद्यार्थिनी आहे. तीला पुढील वाटचालीस शुभेच्छा!

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …