Home / Uncategorized / स्वाती पाचपांडे ह्यांच्या व्यवस्थापन विषयावरील दोन पुस्तकांचे ठाणे येथे प्रकाशन

स्वाती पाचपांडे ह्यांच्या व्यवस्थापन विषयावरील दोन पुस्तकांचे ठाणे येथे प्रकाशन

ठाणे। अनघा प्रकाशन संस्थेने आपल्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्त ‘अनघोत्सव’ या कार्यक्रमाचे ठाणे येथे आयोजन केले होते. या कार्यक्रमास आदरणीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, नाट्य क्षेत्रातील दिग्गज पद्मश्री वामनराव केंद्रे, डॉ.विलास खोले, डॉ.अनंत देशमुख, डॉ.महेश केळुस्कर, आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर अशी दिग्गज मंडळी उपस्थित होती. अनघाचे संपादक अमोल नाले यांनी प्रास्ताविक केले. डॉ.महेश केळुस्कर यांची चार पुस्तके आणि पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन सुद्धा या वेळी करण्यात आले.

यावेळी नाशिकच्या लेखिका स्वाती पाचपांडे ह्यांची दोन पुस्तके ‘मॅनेज मॅन 1’ आणि ‘मॅनेज मॅन 2’ अशी प्रकाशित करण्यात आली. दैनंदिन जीवनातील व्यवस्थेवर भाष्य करणारे मार्गदर्शक असे हे पुस्तक आहे. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी, शिक्षक ह्यांना उपयुक्त पुस्तक असा गौरव मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर ह्यांनी केला. अनुक्रमे नाशिकचे उद्योजक देवकिसनजी सारडा तसेच विश्‍वास बँकेचे चेअरमन विश्‍वास ठाकूर ह्यांची प्रस्तावना लाभली आहे. अनघा प्रकाशन संस्थेचे संस्थापक मुरलीधर नाले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवर त्या प्रसंगी उपस्थित होते. डॉ.राम नेमाडे, लीला गाजरे, अनु जावळे, सुजाता टोके, मंजू पिंपळोदकर, अशोक इंगळे, गोपाळ पाटील, सी.बी.पाटील आदि मान्यवरांनी आपली उपस्थिती दिली.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …