Home / Uncategorized / पर्यावरण महाअभियानासाठी सरसावले लेवा समाजाचे तरुण

पर्यावरण महाअभियानासाठी सरसावले लेवा समाजाचे तरुण

पर्यावरणासाठी लेवा समाजाचे तरुण झपाटले

जळगांव । जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यावल वनविभागाचे उपवन संरक्षक प्रकाश मोरणकर (आय.एफ.एस.) यांना ईगल ग्लोबल फाउंडेशनतर्फे महाअभियानची आकर्षक फ्रेम अध्यक्ष व पर्यावरण प्रेमी विलास महाजन, सोबत पत्रकार तुषार वाघुळदे यांनी भेट म्हणून दिली.
पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात काम हाती घेतल्याने सर्व स्तरातून वाघुळदे, महाजन व संपूर्ण टीमचे कौतुक होत असून चोपडा आणि रावेर तालुक्यातील अनेक आदिवासी पट्ट्यात ही कामे सुरू आहेत.

लेवा समाजातील ही मंडळी पर्यावरणासाठी झपाटलेली आहेत. अनेक योजनाही सदर संस्था आणि पाच ग्रुप राबवित आहेत तसेच दोन गावेही दत्तक घेतली आहेत हे विशेष.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …